पुण्यातील विवाहितेचे धुळे बसस्थानकातून दोन लाखांचे दागिणे लंपास


Pune married woman steals jewelery worth two lakhs from Dhule bus station धुळे : पुण्यातील विवाहिता बसच्या प्रतीक्षेत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत दोन लाखांचे दागिणे असलेली पिशवी लांबवली. बुधवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली. याबाबत शहर पोलिसात हर्षला सुनील चौधरी (34, आळंदी रोड, दिघी, पुणे) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा इाखल करण्यात आला.

चोरट्यांनी दागिण्यांची पिशवीच लांबवली
चौधरी यांच्या फिर्यादीनुसार बुधवार, 28 जून रोजी सकाळी 11 वाजता त्या धुळे बसस्थानकात आल्या. धुळे-सुरत जाणार्‍या बस फलाटावर त्या उभ्या असतांना चोरट्यांनी त्यांची दागिण्यांची पिशवी लांबवली. या पिशवीमध्ये एक लाख 60 हजार किंमतीची चार तोळे वजनाची सोन्याची चैन, 24 हजार रुपये किंमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातील दागिने, चार हजार रुपये किंमतीची एक ग्रॅम वजनाची अंगठी आणि अडीच हजारांची रोकड असा एक लाख 90 हजार 500 रुपये किंमतीचे दागिने होते. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक वाडीले करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !