Dr. Nitin Kulkarni यावल शहराचे सुपूत्र डॉ.नितीन कुलकर्णी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य
Dr. Nitin Kulkarni, son of Yaval city ; Principal of Fergusson College यावल : देशातील सर्वात प्रतिष्ठीत महाविद्यालयांपैकी एक असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी यावलच्या सुपुत्राची नियुक्ती झाली आहे. जळगाव जिल्ह्याचे सुपूत्र डॉ.नितीन मधुकर कुलकर्णी यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचा प्राचार्यपदाची नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत.
यावलवासीयांचा वाढला गौरव
अभ्यासू, संयमी, सुशील आणि परीपक्व असलेल्या डॉ.कुलकर्णी यांनी प्रचंड कष्ट, प्रामाणिकपणा या गुणांनी हे शिखर गाठले. त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. यावल येथील तारकेश्वर विद्या मंदिर, सरस्वती विद्या मंदिरातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, जळगावच्या मू.जे.महाविद्यालयातून पदवी, पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण व पीएच. डी. आणि नंतर प्रसिद्ध अशा फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापन असा विलक्षण प्रवास आहे. तेथेच उप प्राचार्य म्हणून जबाबदारी यशस्वपणे सांभाळली आहे. डॉ.नितीन कुलकर्णी नाशिक ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.

