Shahada forester and three in ACB’s net एक लाखांची लाच मागणी भोवली : शहादा वनपालासह तिघे एसीबीच्या जाळ्यात
नाशिक एसीबीची शहादा शहरात कारवाई : वनविभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ
One lakh bribe demanded : Shahada forester and three in ACB’s net शहादा : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासह जामीन मिळण्यास सहकार्य करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून तडजोडीअंती एक लाखांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्या शहादा वनपाल संजय मोहन पाटील (54, शहादा) यांच्यासह शहादा वनरक्षक दीपक दिलीप पाटील (27, शहादा) व खाजगी पंटर नदीम खान पठाण (37, शहादा, जि.नंदुरबार) यांना नाशिक एसीबीने शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याने लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे लाच प्रकरण
शहादा शहरातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या लहान भावावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरीक्षेत्र कार्यालयात गुन्हा दाखल असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी खाजगी पंटरामार्फत वनपाल संजय पाटील व वनरक्षक दिलीप पाटील यांनी 8 व 9 मे 2023 रोजी दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती व एक लाख रुपये देण्यावर तडजोड झाली तसेच 25 हजार रुपये सरकारी वकीलांसाठी मागण्यात आले होते. या प्रकारानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली मात्र संशयितांना संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी संशयिताना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली संशयितांवर कारवाई
ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, नितीन कराड, प्रभाकर गवळी, प्रवीण महाजन आदींच्या पथकाने करीत संशयितांना शुक्रवारी सायंकाळी अटक केली.