नांद्रा येथील 34 वर्षीय तरुणाची आत्महत्या


Suicide of a 34-year-old youth from Nandra जळगाव : 34 वर्षीय तरुणाने आलेल्या नैराश्यातून गळफास घेतला. ही घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे रविवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल उर्फ अमोल विठ्ठल पाटील (34) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मृतदेह पाहताच कुटूंबियांनी फोडला टाहो
राहुल पाटील हा जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे आई व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. त्यांचे घर दुमजली असून वरच्या घरात मोठा भाऊ व त्याची पत्नी राहतात तर खालच्या घरात आईसोबत राहुल राहत होता. हातमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा घटस्फोट झाल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. रविवार, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांची आई कमलबाई ह्या मंदिरात गेल्यानंतर घरी एकटा असताना राहुलने गळफास घेतला. आई कमलबाई घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणार्‍या ग्रामस्थांनी राहुलला जळगाव जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई कमलबाई, मोठा भाऊ महेश आणि दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !