पीजे रेल्वे मार्ग ब्रॉडगेजसह बोदवडपर्यंत वाढवण्यास मान्यता


जळगाव- नॅरोगेज असलेल्या पाचोरा-जामनेर या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासह हा मार्ग बोदवडपर्यंत वाढवण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. पाचोरा ते पहूर या नॅरोगेज असलेल्या मार्गाची सुरुवात 1918 मध्ये झाली. त्यानंतर जामनेरपर्यंतची सेवा 1919 मध्ये सुरू झाली. 1925 पर्यंत द ग्रेट इंडियन पेनीसुला रेल्वे कंपनीसोबत करार संपुष्टात आल्यावर तत्कालीन ब्रिटीश सरकारने कारभार भारतीय रेल्वेच्या स्वाधीन केला. मात्र त्यानंतरही पाचोरा-जामनेर या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले नव्हते. आता ही मागणी पूर्ण झाली असून हा मार्ग बोदवडपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या मार्गासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्री गोयल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री खडसे व रक्षा खडसे यांनी सांगितले.


कॉपी करू नका.