आजीच्या दशक्रियेला निघालेल्या नातवाचा बसमध्ये हृदयविकाराने मृत्यू
Grandson dies of heart attack in bus while leaving for grandmother’s Dasakriya धुळे : आजीच्या दशक्रियेला निघालेल्या सोयगावातील नातवाचा हृद्यविकाराने बसमध्येच मृत्यू झाला. ही घटना फागणे शिवारात मालेगाव- चोपडा बसमध्ये शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. रवींद्र देवराम खैरनार (56, रा. सोयगाव ता. मालेगाव) असे मयताचे नाव आहे.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
रवींद्र खैरनार हे मालेगाव कृषी महाविद्यालयात ते कार्यरत होते. ते शनिवारी चोपडा येथे आजीच्या दशक्रियेला जाण्यास निघाले होते. त्यासाठी ते मालेगाव बसस्टॅण्डला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत कुटूंबिय होते. मालेगाव-चोपडा बसने ते अमळनेर मार्गे चोपड्याकडे जात असतांना फागणे गावातून बस जात असतांना रवींद्र खैरनार यांच्या छातीत कळ आली. कुटुंबिय व बस चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर बस थांबवण्यात आली. त्यानंतर खासगी वाहनाने रवींद्र खैरनार यांना लागलीच हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सुमित ठाकूर तपास करता आहे.