रुग्णांची हेळसांड होत असल्यास लक्ष वेधणार

आमदार एकनाथराव खडसे : मुक्ताईनगरात आरोग्य विभागाची आढावा बैठक


मुक्ताईनगर : विधानसभा मतदारसंघातील आरोग्य विभागात संदर्भात असलेल्या विविध अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या उपाययोजना या संदर्भात माजी महसूल मंत्री तथा विधानपरीषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खडसे यांनी रुग्णांची हेळसांड होत असल्यास अधिवेशनात लक्ष वेधणार असल्याचा इशारा वरीष्ठ अधिकार्‍यांना दिला. विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या बांधकामाच्या संदर्भात आणि कर्मचारी वर्गाच्या संदर्भात विविध अडचणी व तक्रारी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रीक्त असलेल्या जागा या संदर्भात आमदार खडसे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांची चर्चा केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डीन डॉक्टर गिरीश ठाकूर यांच्या संदर्भात असलेल्या तक्रारीवरून बैठकीतूनच भ्रमणध्वनीवर त्यांच्याशी चर्चा करत रुग्णांची हेडसांड होत असेल तर विधानसभेत प्रश्न मांडला जाईल, असा सज्जड दमदेखील त्यांना भरला.

यांची बैठकीला उपस्थिती
प्रसंगी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बाहेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आकाश चौधरी, रावेर वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.डी.महाजन, रावेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक पाटील, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक जाधव, मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील. डॉ.चौधरी, डॉ.बिराजदार, डॉ.बांगर, मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शोएब खान, स्वीय सचिव योगेश कोलते, बोदवड बाजार समितीचे सभापती सुधीर तराळ, संदीप देशमुख, प्रदीप साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !