गावठी कट्ट्यासह अट्टल गुन्हेगार धुळ्यातील मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात
A staunch criminal with Gavathi Kattya in the net of Mohadi police in Dhule
धुळे : धुळे तालुक्यातील मोहाडी पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयिताच्या ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. शुभम जगन साळुंखे (घर नंबर 199, गुरुदत्त मंदिराजवळ, हमाल मापाडी, धुळे, ह.मु.म्हाडा वसाहत, तिखी रोड, मोहाडी उपनगर, ता.जि.धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांना संशयित शुभम साळुंखे याने गावठी पिस्टल आणल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. हॉटेल रेसीडेन्सीजवळील फ्लाय ओव्हरजवळ संशयित मंगळवारी रात्री 9.15 वाजता संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीत गावठी कट्टा मिळून आला. संशयिताने बाळा साळवे (पिंपळनेर) सोबत उमर्टी येथून गावठी कट्टा आणल्याने कबुली दिल्यानंतर त्यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
संशयिताविरोधात धुळ्यातील आझादनगर पोलिसात तीन गुन्हे दाखल असून अमळनेर पोलिसातही गुन्हा दाखल आहे. ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, नाईक भूषण सपकाळ, अविनाश पाटोळे, संदीप पाटील आदींच्या पथकाने केली.




