चोरवडच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या


Chorwad youth committed suicide by hanging himself रावेर : रावेर तालुक्यातील चोरवड गावातील 40 वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. मुकेश प्रकाश महाजन (40, चोरवड, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे. मुकेश महाजन हॉटेलवर वेटर म्हणून कामाला होता व त्याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी व मुले त्याला सोडून माहेरी निघून गेल्याने तो एकटाच घरी वास्तव्यास होता.

दारूच्या आहारी जात आत्महत्या
घरी कुणी नसताना त्याने घरात गळफास घेतल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यानंतर त्यास ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले अता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अत्लाफ पठाण करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !