हरताळा येथे किरकोळ वादातून माय-लेकास मारहाण
My-Leka beaten up over petty dispute at Hartala मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे किरकोळ वादातून माय-लेकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
सायराबी सैय्यद लुकमान (42, मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, वाल्मीक चौकात सोमवार, 21 रोजी सकाळी 11 वाजता संशयितांनी हातातील लोखंडी रॉड व काठीने फिर्यादीसह त्यांचा मुलगा सैय्यद लुकमान (26) यांना मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी वसीमखान शब्बीर खान, शेख रहेमान शेख उस्मान, मोहसीन खान शब्बीर खान, अक्रम खान रईस खान (सर्व रा.हरताळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक विजय पढार करीत आहेत.








