भुसावळातील गोदावरी कॉलनीतून दुचाकी लांबवली


Bike extended from Godavari Colony in Bhusawal भुसावळ  : शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम असून चोरट्यांनी गोदावरी कॉलनीतील महागडी 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
अभिमन्यूकुमार प्रसाद (34, गोदावरी कॉलनी, आर.बी.क्वार्टर, भुसावळ) हे रेल्वेत सहाय्यक लोकोपायलट आहेत. नोकरीवर जाण्या-येण्यासाठी त्यांच्याकडे पल्सर (एम.एच.19 डी.एल.9799) क्रमांकाची दुचाकी असून चोरट्यांनी ती घराबाहेरील कम्पाउंडमधून लांबवल्याचा प्रकार 21 ते 22 ऑगस्टदरम्यान घडला. याप्रकरणी शहर पोलिसात प्रसाद यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !