किनगावातील 24 वर्षीय विवाहितेचा छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा


Harassment of 24-year-old married woman in Kingaon : Crime against husband and three यावल : यावल तालुक्यातील किनगावातील माहेर असलेल्या 24 वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावे म्हणून पतीसह तिघांनी छळ केला व तिला शिविगाळ करीत मारहाण करीत माहेरी सोडून दिले. विवाहितेने याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
किनगाव, ता.यावल येथील माहेर असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (24) या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा विवाह 2017 मध्ये विजय रवींद्र पाटील (आशा बाबा नगर, जळगाव) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली तसेच पती विजय रवींद्र पाटील, सासू प्रतिभा रवींद्र पाटील, नणंद देवाबाई अशोक पाटील (आशा बाबा नगर, जळगाव) या तिघांनी तिला माहेरून घर घेण्यासाठी पन्नास हजार रुपये आण म्हणून छळ करीत मारहाण करीत शिवीगाळ केली आणि माहेरी सोडून दिले. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !