अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू माती गणेश मूर्ती बनविण्याबाबत कार्यशाळा
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा र्हास होत असल्याने पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून, सुंदर रंगवून त्याच मूर्तीची स्थापना करावी या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भिजवलेले मातीचे गोळे अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे मोफत देण्यात येणार आहे. कार्यशाळेत सहभागी होणार्या विदयार्थ्यानी छोटा मग, प्याड किंवा पाटी, दोन कापड, खराब पेन किंवा बारीक स्क्रू ड्रायव्हर, दोन रद्दी पेपर, प्यायला पाणी बॉटल सोबत आणायची आहे.
3 सप्टेंबर रोजी कार्यशाळा
पहिल्या 175 रजिस्ट्रेशन करण्यार्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ऐनवेळी प्रवेश दिला जाणार नाही तसेच रजिस्ट्रेशन सुद्धा केले जाणार नाही. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रकल्प प्रमुख, समन्वयक अथवा सह समन्वयक यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आपले नाव, इयत्ता, शाळा, पत्ता, मोबाईल नंबर टाईप करून पाठवणे अनिवार्य आहे. कार्यशाळा रविवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 1 वाजे दरम्यान, लोणारी मंगल कार्यालय, रींग रोड, भुसावळ येथे होणार आहे. कार्यशाळेचे प्रशिक्षक हितेंद्र नेमाडे असणार आहे. कार्यशाळेचे प्रकल्प प्रमुख म्हणून कुंदन वायकोळे (7588816905), समन्वयक म्हणून तेजेंद्र महाजन ( 9511213830), सहसमन्वयक भूषण झोपे (9881018888) असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे असणार आहे. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांचे उपक्रमास विशेष सहकार्य लाभले आहे. उपक्रम समितीत ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, संजय भटकर, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राहुल भारंबे, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, प्रा.श्याम दुसाने, ललित महाजन, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील असणार आहे.
