रस्त्याची विचारणा करीत एरंडोलमध्ये वयोवृद्धेच्या गळ्यातून 15 ग्रॅमची मंगलपोत लांबवली


A mangalpot of 15 grams was extended from the neck of an elderly person in Erandole while asking for directions एरंडोल : धरणगाव रस्ता कोठे आहे? असे विचारून मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 69 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची 17 ग्रॅम वजनाची मंगळपोल लांबवली. ही घटना गुरुवारी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर घडल्याने शहरातील महिलावर्गात भीती पसरली आहे.

पायी फिरायला जाताना घटना
परदेशी गल्लीमधील रहिवासी विमलबाई लक्ष्मण चौधरी ह्या नेहमीप्रमाणे सकाळी शासकीय विश्रामगृहासमोरील रस्त्यावर फिरायला गेल्या असता विमलबाई चौधरी ह्या विश्रामगृहाच्या पुढे चालत असतांना मोटार सायकलवरून तीन युवक आले आणि त्यांच्याजवळ थांबून धरणगाव रस्ता कोठे आहे?. तसेच दुसरा रस्ता कोणता आहे?, असे विचारले. त्यानंतर विमलबाई चौधरी माहिती देवून पुढे चालत असतांना मोटार सायकलवरील दोघै पुढे निघून गेले व मागे असलेल्या युवकाने विमलबाई चौधरी यांच्या गळ्यातील 35 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत ओढण्याचा प्रयत्न केला.







विमलबाई चौधरी यांनी त्यास प्रतिकार केला असता त्यांना खाली पाडून मंगलपोत ओढली आणि जवळच असलेल्या मक्याच्या शेतातून पळ काढला. याचवेळी दत्त मंदिराकडून येत असलेल्या करण परदेशी याने दुचाकीवरील युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत मोटारसायकलवरील एका युवकाचा मोबाईल खाली पडला व ते पळून गेले. विमलबाई चौधरी यांनी चोरट्यांना प्रतिकार करून मंगलपोत घट्ट धरून ठेवल्यामुळे अर्धवट तुटलेली सुमारे 17 ग्रॅम वजनाची 72 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवली तर उर्वरीत पोत विमलबाई चौधरी यांच्या साडीत अडकल्यामुळे सुरक्षित राहिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !