कर्जापुढे हात टेकल कुर्हा हरदोच्या शेतकर्याची आत्महत्या
Farmer of Hardo commits suicide due to debt बोदवड : सातत्याने वाढत असलेला कर्जाचा डोंगर व शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून बोदवड तालुक्यातील कुर्हा हरदो येथील शेतकरी शंकर कृष्णा माळी( 40, रा.माळी वाडा) यांनी मंगळवारी राहत्या घरात आत्महत्या केली.
कर्जापुढे टेकले हात
शेतकर्यावर शेतीचे 60 हजारांचे तर कृषी सेवा केंद्राचे व बचत गटांचे सुमारे 11 हजारांचे कर्ज झाले होते. यंदा सुरूवातीला
सुरवातीला परीसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते तर दुबार पेरणीनंतर मागील तीन आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था सुद्धा समाधानकारक नसल्याने शेतकर्याला नैराश्य आले होते. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकर्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणी मयताचे भाऊ रघुनाथ माळी यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार सचिन चौधरी हे करीत आहेत. मयत शंकर माळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.








