भुसावळातील खातेधारकाचे सहा चेक बाऊन्स : मुंबईच्या आरोपीला सहा महिन्यांची शिक्षा
Six checks bounced by an account holder in Bhusawal : Mumbai accused gets six months sentence
भुसावळ : तब्बल सहा धनादेशांचा अनादर झाल्याप्रकरणी आरोपीला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
असे आहे अनादर प्रकरण
तक्रारदार अरविंद सेवकराम पाटील (भुसावळ) यांनी एलकेपी सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी तीन लाख रुपये गुंतवले होते व त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेची मागणी केल्यनंतर संबंधित कंपनीचे नागेश होतकर (मुंबई) मुंबई यांनी त्यांनी प्रत्येकी 50 हजारांप्रमाणे सहा चेक (धनादेश) दिले मात्र बँकेत हे चेक टाकल्यानंतर ते बाऊन्स (अनादर) झाल्याने भुसावळ न्यायालयात प्रत्येक धनादेशाचा अनादर झाल्याचा स्वतंत्र खटला दाखल करण्यात आला. आरोपी सिद्ध झाल्याने प्रत्येकी सहा चेकसाठी 50 हजार मूळ रक्कम व सात हजार 500 रुपये दंड देण्याचे आदेश न्यायालयाने देत संशयिताला प्रत्येकी एका महिन्यांची शिक्षा सुनावली.








