देशभरातील संतांनी घेतला प्राकृतिक चिकित्सेचा लाभ
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज : निष्कलंक धाम वढोदे येथे पत्रकार परीषद
फैजपूर : सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट फैजपूर निर्मित निष्कलंक धाम वढोदे येथे तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये देशभरातील संत महंतासाठी 9 ते 14 सप्टेंबर 2023 दरम्यान पाच दिवसीय प्राकृतिक चिकित्सा शुद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले.. या शिबिरात देशभरातील संतांनी उपस्थिती देत प्राकृतिक चिकित्सेचा लाभ घेतल्याची माहिती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परीषदेत दिली. सामान्य व्यक्ती पेक्षा संतांचा परीवार मोठा असतो व त्यांची व्यस्तता सुद्धा जास्त असते त्यामुळे त्यांना या चिकित्सेची जास्त आवश्यकता आहे.
अनेक क्रियाद्वारे शरीर शुद्धी
या शिबिरात जलनीती, शंखप्रकक्षालन, नस्य, कटी स्थान, मठ थेरेपी, वमन, शिरोधारा, सूर्यभाप स्नान, भापस्नान, गरम पादस्नान, फुल बॉडी मसाज, आहार चिकित्सा, योगासन, प्राणायाम, हास्य चिकित्सा, योगनिद्रा, संगीत चिकित्सा अशा अनेक क्रियाद्वारे शरीर शुद्धी करण्यात आली व सतपंथ चॅरीटेबल ट्रस्ट मार्फत या शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले. अशा प्रकारे संतांसाठी आयोजित झालेले हे पहिलेच उद्घाटन शिबिर होते. शिबिराचे संचलन विश्वप्रख्यात आचार्य डॉ.सचिन पाटील यांनी केले. या शिबिराला भारतभरातून राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, ओडिसा, महाराष्ट्र आदी प्रदेशातून या संतांची शिबिरासाठी उपस्थिती होती.

या संतांची होती उपस्थिती
श्री श्री 1008 माधवाचार्य महाराज (मलाड तपोवन मुंबई), जगद्गुरु सतपंथाचार्य ज्ञानेश्वरदासजी महाराज (प्रेरणापीठ अहमदाबाद, गुजरात), राधे राधे बाबा (इंदोर), महामंडलेश्वर महंत रामकृष्णदासजी महाराज (जगन्नाथ पुरी ओडिसा), प. पू. गोपाल चैतन्य बाबाजी (वृंदावन धाम, पाल), महामंडलेश्वर महंत रामकृष्ण दासजी महाराज (जगन्नाथ पुरी, ओडिसा), महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज (गादिपती सतपंथ आश्रम, फैजपूर), महंत भक्ती चरणदासजी महाराज (पंचमुखी हनुमान मंदिर, तपोवन पंचवटी, नाशिक), महंत काशिदास त्यागी महाराज (हजारी हनुमान मंदिर, पवासा, उज्जैन), संत श्री छगन बापा बालाशहा मंदिर (खंबात गुजरात), महंत शांतीप्रसादासजी महाराज (निष्कलंक धाम, गुजरात), योग तपोनिष्ठ प्रेमदास बापू (पंचवटी दहेगाव, गुजरात), प.पू.पुरणचंद्र दासजी महाराज (जगन्नाथ पुरी, ओडिसा), जानकीदासजी महाराज (निमच म.प्र.), हभप धनराज महाराज जगन्नाथ महाराज (अंजाळे संस्थान), ब्रज चैतन्यजी महाराज (पाल), हभप भरत महाराज (म्हैसवाडी), श्यामचैतन्यजी महाराज (गुरुदेव सेवाश्रम, जामनेर), सर्वचैतन्यजी महाराज (सद्गुरु आश्रम अंबाडी प्रकल्प संभाजीनगर), नवनीत चैतन्यजी महाराज (वृंदावन धाम पाल), हरिदासजी महाराज अधिकारी मंदिर (सिहोर), प.पू.गोपाल कृष्ण चैतन्यजी महाराज (सद्गुरु धाम कन्नड), वीरेंद्र मिश्राजी (मालाड मुंबई), जानकीदास महाराज (नीमच मध्य प्रदेश) आदी संतांची उपस्थिती होती.

