सातपुडा निवासिनी मनुदेवीचा उद्या यात्रोत्सव


Satpura resident Manudevi’s pilgrimage tomorrow यावल : सातपुडा निवासिनी आई मनुदेवीचा यात्रोत्सव शुक्रवार, 15 रोजी साजरा होणार आहे. सालाबादाप्रमाणे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी हा यात्रोत्सव साजरा होतो. यंदा सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणात दर्शन घेण्याकरीता राज्यभरातून लाखोच्या संख्येने भाविक वर्ग येण्याची शक्यता आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून तयारी पुर्ण करण्यात आली. पोलीस प्रशासनाकडून मंदिर परीसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यात्रोत्सवाची तयारी पूर्ण
आडगाव, ता.यावल जवळील सातपुड्याच्या कुशीत खान्देशाची कुलदैवत आई मनुदेवीचे मंदिर आहे. सातपुड्याच्या नटलेल्या वनराईत निर्सगरम्य वातावरणात येथे शुक्रवारी यात्रा भरणार आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी अर्थात पिठोरी अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी येथे यात्रोत्सव भरतो. या ठिकाणी यात्रेनिमित्त दर्शनासाठी राज्यभरातून भाविक वर्ग येत असतो. दर्शनार्थ येणार्‍या भाविकांसाठी स्त्री-पुरूष अशा रांगा लावुन दर्शनासाठी सोय मंदिर व्यवस्थापानाकडून करण्यात आली आहे. नवस फेडणार्‍या भाविकांसाठी येथे सभा मंडपात व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिली. यंदा सातपुड्याच्या पर्वतरांगेत दमदार पावस झाल्याने येथील धबधबा ओसांडून वाहत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !