एरंडोल-जळगाव महामार्गावर भीषण अपघात : भरधाव लक्झरी उलटून दोघे ठार ; 12 प्रवासी जखमी


Horrible accident on Erandol-Jalgaon highway : Two killed after speeding luxury overturns; 12 passengers injured एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून भरधाव लक्झरी नियंत्रण सुटल्याने नाल्याखाली कोसळून झालेल्या अपघातात लक्झरी चालकासह क्लीनर जागीच ठार झाले तर 12 प्रवासी जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

जखमींवर जळगावात उपचार
एरंडोल तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला. चौधरी कंपनीची लक्झरी क्रमांक (ए.आर.01 वाय.0009) ही 30 प्रवासी घेवून निघाल्यानंतर लक्झरी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाखाली कोसळल्याने दोन प्रवासीजागीच ठार झाले तर 12 प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. हा अपघात शनिवार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता घडला. प्रत्यक्षदर्शीनुसार लक्झरी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात झाला.

अपघातानंतर पोलिसांची धाव
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याकामी मदत केली. या अपघातात दिपेंद्र कुमार, दिनेश कुमार, रतनलाल कुमावत, जयराम कुंभार, महादेव कुंभार, राजेंद्र प्रजापती, सिताराम कुमार, मुकेश गुजर, लक्ष्मी जांगेड आणि दोन अनोळखी असे 12 जण जखमी झाले आहे.

चालकाची ओळख पटली
सूत्रांच्या माहितीनुसार, निमकथाना, जिल्हा राजस्थान येथून औरंगाबाद जिल्ह्यात चौधरी यात्रा कंपनीची ट्रॅव्हल्स बस ही दोन दिवसांपूर्वी प्रवाशांना घेवून निघाली होती. या अपघातात चालक व क्लीनर यांचा मृत्यू झाला असून त्यातील एकाचे नाव मुकेश कुमार शंकरलाल गुर्जर (40, राजस्थान) असे असल्याचे समजते तर दुसर्‍या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या मुकेश छोटेलाल गुजर (35), बलराम किशोराम गुजर (40) दीपेंद्र कुमार सिंग (40), अशोक यादव (35) या चार जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आणखी सात जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.


कॉपी करू नका.