मनवेलच्या तरुणाने घरी कुणी नसताना उचलले टोकाचे पाऊल
Manvel’s young man took the extreme step when no one was at home यावल : यावल तालुक्यातील मनवेल गावातील 31 वर्षीय तरुणाने राहत्या घरात सोमवारी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नितीन अमृत कोळी (31, मनवेल) असे मयत युवकाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सोमवारी घरात तरुणाने साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शांताराम पंढरीनाथ कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे. मयत तरुणाने आत्महत्या का केली ? हे कळू शकले नाही. मयत तरुणाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे.








