आमोदा शेत-शिवारातून 30 हजारांच्या ठिबक नळ्या लांबवल्या
Drip tubes of 30 thousand were extended from Amoda Shet-Shivara यावल : यावल तालुक्यातील आमोदा शेत-शिवारातून अज्ञात चोरट्याने ठिबक नळ्या लांबवल्या. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. 30 हजार रुपये किंमतीच्या व 500 मीटर लांबीच्या ठिबक नळ्यांचे 20 बंडल शेतातून लांबवल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
आमोदा, ता.यावल येथील शेतकरी बाळू श्रीधर पाटील यांच्या भालोद रस्त्यावरील शेत गट क्रमांक 1088 मध्ये त्यांनी ठिबक नळ्या शेतात टाकल्या होत्या. पाचशे मीटर लांबीच्या ठिबक नळ्यांचे वीस बंडल मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लांबवले. सोमवारी सकाळी चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर बाळू पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश चौधरी करीत आहे.








