वाहनधारकांनो लक्ष द्या : भादली रेल्वे गेट 9 दिवस राहणार बंद
Attention motorists: Bhadli Railway Gate will remain closed for 9 days भुसावळ : जळगाव-भादली दरम्यान रेल्वे दुरुस्तीच्या कामासाठी संपर्क गेट क्रमांक 150 (लेव्हल क्रॉसिंग गेट) 19 ते 28 सप्टेंबरदरम्यान बंद ठेवण्यात येार आहे. पादचारी तसेच वाहनधारकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
जळगाव-भादली दरम्यान रेल्वे दुरुस्तीचे काम सुरू आहे. आय.424/21-23 डाऊन रोड कामासाठी गेट क्रमांक 150 (लेव्हल क्रॉसिंग) 19 रोजी सात ते 28 सप्टेंबर रोजी आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. गैरसोयीची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
