यावल शहरातील कुंभार टेकडीवरून चोरट्यांनी ट्रॅक्टर लांबवले
Thieves stole a tractor from Kumbhar hill in Yaval city यावल : शहरातील डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल रोडवरील कुंभार टेकडीवरून चोरट्यांनी 75 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर लांबवले. हा प्रकार सोमवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरात वाढल्या चोर्या
डॉ.जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलजवळील कुंभार टेकडीजवळ फुलचंद रामचंद्र पंडीत यांच्या घरासमोर अजय मूलचंद पंडित यांनी आपले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.28 डी. 9887) लावले असता चोरट्यांनी संधी साधली. यावल पोलीस ठाण्यात अजय पंडित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.








