पूरनाड गावातील तरुणाची विहिरीत उडी घेत आत्महत्या
Purnad village youth committed suicide by jumping into a well मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड गावातील 34 वर्षीय तरूणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपकअशोक इंगळे (34, पुरनाड ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती आहे.
आजाराला कंटाळून उचलले पाऊल
दीपक इंगळे हा आपल्या नातेवाईकसह मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दुर्धर आजार जडला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपासून तो घरीच होता. त्यात त्याला या दुर्धर आजारामुळे अतिशय त्रास होत असल्याने या आजाराला कंटाळून मंगळवारी रात्री दीड ते सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा करण्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक धमेंद्र ठाकूर करीत आहे.








