यावल तालुक्यात अतिरीक्त ठरलेल्या 17 शिक्षकांचे समायोजन


यावल : यावल तालुक्यातील जिल्हा परीषद मराठी आणि उर्दू माध्यमातील 17 शिक्षक हे संच मान्यता 2022-23 व आजच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार अतिरीक्त ठरले होते. या सर्व 17 शिक्षकांचे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार समायोजन प्रक्रिया यावलच्या गट साधन केंद्रात पार पडली. यात 17 पैकी एका शिक्षकाने या समायोजन संदर्भात तक्रार केली.

केवळ एका शिक्षकाची तक्रार
यावल तालुक्यात संच मान्यता 2022-23 व आजच्या स्थितीतील त्या त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंस्थेला समोर ठेवत मराठी माध्यमातून 10 उपशिक्षक तसेच उर्दू माध्यमातील एक ग्रेड मुख्याध्यापक, एक पदवीधर शिक्षक आणि पाच उपशिक्षक असे एकूण 17 शिक्षक हे अतिरीक्त ठरले होते. या 17 शिक्षकांचा यावल तालुक्यातील विविध शाळांमध्ये यात प्रामुख्याने दोन शिक्षकी शाळा व बहुशिक्षकी शाळेत शिक्षकांच्या ज्येष्ठतेसह इच्छेनुसार समायोजन करण्यात आले. यासाठी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली यावलच्या गट साधन केंद्रात गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत सर्व शिक्षकांना बोलावण्यात आले व त्यांच्या इच्छेनुसार शाळा निवडीची संधी त्यांना देण्यात आली.

सेवा ज्येष्ठतेनुसार या सर्वांचे समायोजन करण्यात आले. या समायोजना संदर्भात ईस्माईल तडवी या शिक्षकांने तक्रार नोंदवली आहे. या शिक्षकास त्यांच्या इच्छेनुसार शाळा देणे शक्य नसल्याने त्यांनी तक्रार नोंदवल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !