कोळवद रस्त्यावर बसला अपघात : दोन विद्यार्थी जखमी


Bus accident on Kolwad road : Two students injured यावल : रस्त्यावर अचानक गुरे समोर आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी बस चालकाने अचानक ब्रेक मारल्याने बस रस्त्याच्या कडेला जावून चारीत कोसळल्याने या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. यावल पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदवण्यात आली

दोन विद्यार्थी किरकोळ जखमी
यावल एस.टी.आगाराची बस (क्रमांक एम.एच.20 डी.9975) चालक संतोष नामदेव कोळंबे हे गुरूवारी सकाळी वड्री येथून यावलकडे येत असताना कोळवद ते यावल रोडवर सुधाकर सावखेडकर यांच्या शेताच्या समोर अचानक गुरं-ढोरं रस्त्यावर आल्यानंतर बस चालक कोळंबे त्यांनी जोराने ब्रेक दाबल्याने बस अनियंत्रीत होवून रस्त्याच्या कडेला जाऊन चारीत आदळली.







या अपघातामध्ये दिव्या ललित भंगाळे (15, वड्री) व मुशरा मुजम्मिल जमादार (14, परसाडे) या दोन विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली. दोघांवर तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी चालकाने दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !