तळवेल येथील शेतकर्‍याचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू


भुसावळ : भुसावळ तालुक्यातील तळवेल तळवेल येथील शेतकर्‍याचा शेतात इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला. मंगळवार, 19 रोजी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. निलेश गोपाल पाटील (43, तळवेल) असे मयताचे नाव आहे.

शेतात लागला इलेक्ट्रीक शॉक
निलेश पाटील हे तळवेल शिवारात शेतात गेल्यानंतर त्यांना इलेक्ट्रीक शॉक लागला व अत्यवस्थ अवस्थेत भुसावळातील गोल्डर अवर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक प्रमोद कंखरे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !