रावेरकरांनी जपलेला एकोपा कायम राखून सण-उत्सव साजरा करा : जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार

सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबीनिमित्त रावेरात बैठक


Celebrate the festival by maintaining the harmony maintained by Raverkar : District Superintendent of Police M.Rajkumar रावेर : सर्वांनी नियमांचे पालन करीत सण-उत्सव शांततेत साजरा करावा. गेल्या चार ते पाच वर्षांपासून येथे एकोपा असल्याने शांतता नांदत आहे. आपला रावेर तालुका याबाबत उत्कृष्ट आहे. आता हाच एकोपा आपण सर्वांनी तसाच ठेवत पोलिसांना दिलासा द्यावा जेणेकरून इथली पोलीस यंत्रणा आम्ही इतर ठिकाणी वापरू व या ठिकाणी अशीच कायम शांतता नांदेल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केला. जिल्हा पोलीस विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबीनिमित्त येथील के. एस. गर्ल्स हायस्कूलच्या जिमखाना हॉलमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर प्रांताधिकारी कैलास कडलगत, डीवायएसपी कुणाल सोनवणे, तहसीलदार बी.ए.कापसे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, फौजदार सचिन नवले, मुख्याधिकारी स्वालीहा मालगावे, बांधकाम विभागाचे अभियंता चौधरी, वीज वितरणचे सुंदराणी उपस्थित होते. सुरुवातीला पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पद्माकर महाजन, दिलीप कांबळे, प्रल्हाद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.

जातीय सलोखा राखा
डीवायएसपी कुणाल सोनवणे म्हणाले की. गेल्या वर्षाप्रमाणेच हिंदू, मुस्लीमांनी एकमेकांचे स्वागत करावे जेणेकरुन जातीय सलोखा राहील. आगामी निवडणुकांसाठी हा शांततेचा संदेश वर्षानुवर्षे देता येईल. पोलीस कायद्याचा भंग करणार्‍यांना कधीही विसरत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व गणेश मंडळांच्या तरुणांनी चिंतन बैठक आयोजित करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी रावेरमधील गेल्यावर्षी मिरवणुकीत गुलाला ऐवजी फुले उधळण्याचा उपक्रम प्रशंसनीय राहिल्याचे सांगितले. तालुक्यातील सण, उत्सव गतवर्षाप्रमाणे साजरा करा, असे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
बैठकीस माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, दारा मोहंमद, ज्ञानेश्वर महाजन, अशोक शिंदे, विजय लोहार, महेमुद शेख, अ‍ॅड.योगेश गजरे, संतोष पाटील, दिलीप पाटील, नितीन पाटील, शैलेंद्र अग्रवाल, गयास शेख, युसूफ खान, डी.डी.वाणी यांच्यासह हिंदू, मुस्लीम पंच कमेटी, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव समिती सदस्य, शहरातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !