साकेगावात वीज कोसळून तरुणीचा मृत्यू : आमदार संजय सावकारे यांची घटनास्थळी भेट
Girl dies due to lightning in Sakegaon: MLA Sanjay Savkare visits the spot भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शुक्रवारी रात्री चुडामण नगरातील एका घरावर वीज कोसळून हर्षा गणेश मनोरे (34) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. नैसर्गिक आपत्तीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशा सूचना शनिवारी आमदार संजय सावकारे यांनी पाहणीदरम्यान केली.
साकेगाव येथील चुडामण नगरात गणेश मनोरे हे वास्तव्यास असून त्यांच्या घरावर रात्री वीज कोसळली. राची खिडकी तुटून घरात असलेल्या हर्षा गणेश मनोरे (34) हिच्या अंगावर वीज पडल्याने ती भाजलेल्या अवस्थेत बाहेर आली. ग्रामस्थांनी तरुणीस तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान हर्षाचा मृत्यू झाला. तरुणीच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परीवार आहे. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी आमदार संजय सावकारे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार नीता लबडे यांना या नैसर्गिक आपत्तीचा पंचनामा करुन मृत तरुणीच्या परीरवाराला भरपाई देण्याची सूचना केली.

दरम्यान मृत हर्षा मनोरे या एमएस्सी शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या प्रतीक्षेत होत्या. या घटनेमुळे साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली. आमदार संजय सावकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती गोलू पाटील, सुनील महाजन, सरपंच परीषदेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, संजय पाटील, उपसरपंच आनंद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे, अतुल झांबरे आदींची उपस्थिती होती.

