भुसावळ शहरातील विवाहितेची तापी पात्रात आत्महत्या


Suicide of married woman in Bhusawal city भुसावळ  : शहरातील द्वारका नगर भागातील 44 वर्षीय विवाहितेने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सुरेखा जितेंद्र वाघमारे (44, द्वारका नगर, रेल्वे परीसर, भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी तापी नदीपात्रात विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर रविवारी सकाळी यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विवाहिता सुरेखा वाघमारे या शनिवारी सायंकाळी अ‍ॅक्टीव्हा (दुचाकी एम.एच.19 सी.एन.4431) वरून शनिवारी सायंकाळी पुस्तक घेण्यासाठी जाते म्हणून बाहेर पडल्या होत्या मात्र सायंकाळपर्यंत त्या घरी न आल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला मात्र तपास न लागल्याने विवाहिता हरवल्याची शहर पोलिसात रात्री 12.30 वाजता नोंद करण्यात आली तर रात्री तापी पुलावर विवाहितेची अ‍ॅक्टीव्हा लॉक केलेली आढळल्यानंतर रविवारी सकाळी तापी पात्रात शोध सुरू करण्यात आला व यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेजमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळला.







यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी व डॉ.प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विवाहितेच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !