भुसावळातील विवाहितेचा जबरीने मोबाईल हिसकावला : आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Bhusawla married woman’s mobile phone forcibly seized: The accused was handcuffed by the market police भुसावळ : शिकवणीसाठी मुलांना सोडून घराकडे परतत असलेल्या विवाहितेचा भामट्याने जबरीने मोबाईल हिसकावल्याची घटना महाराणा प्रताप हायस्कूलमागील कमल मेडिकलजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही व दुचाकी क्रमांकाच्या आधारे संशयित आरोपी अभिषेक राजेंद्र शर्मा (30, रा.वरणगाव रोड, साकरी, भुसावळ) याच्या मुसक्या बांधल्या आहेत.
असे आहे मोबाईल लूट प्रकरण
रेश्मा लोकेश पोहानी (32, राम मंदिरासमोर, आशीर्वाद अपार्टमेंट, भुसावळ) या विवाहिता नेहमीप्रमाणे मुलांना ट्यूशनला सोडण्यासाठी अॅक्टीवा (एम.एच.19 सी.पी.8503) गेल्यानंतर घराकडे निघाल्या असता शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता महाराणा प्रताप हायस्कूलजवळ अनोळखी संशयित तरुण दुचाकी (एम.एच.19 बी.के.8775) ने आला व त्याने विवाहितेच्या पँण्टच्या खिशातून 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. विवाहितेने आरडा-ओरड केली मात्र संशयीत धूम स्टाईल पसार झाला.








