भुसावळ शहरात मिरवणूक मार्गावरील पथदिव्यांची दुरुस्ती


Repair of street lights on procession route in Bhusawal town भुसावळ : शहरात विघ्नहर्त्या गणरायाचे गुरुवार, 28 रोजी विसर्जन होणार असल्याने त्यानुषंगाने पालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. शहरातील मिरवणूक मार्गावर बंद पडलेले स्ट्रीट लाईटची दुरुस्ती रविवारपासून सुरू करण्यात आली आहे तर हायमास्ट दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत तक्रारी केल्या जात होत्या तर शिवसेना उबाठा गटाने नुकतेच याप्रश्नी आंदोलनही केले होते.

यावल रस्त्याची पुन्हा होणार डागडूजी
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मात्र अत्यंत दुरवस्था झालेल्या यावल रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यानंतर सा.बां.विभागाने डागडूजीचे काम हाती घेतले मात्र त्याच दिवशी झालेल्या पावसात संपूर्ण डांबर वाहून गेल्यानेे रस्ता ‘जैसा था’ झाल्याने पुन्हा या रस्त्याची डागडूजी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसाची उघडीप मिळाल्यानंतर लवकरच या कामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्गावर पालिका बसविणार दिवे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरातील मुख्य चौकात आमदार, खासदारांच्या निधीतून बसविण्यात आलेल्या मिनी हायमास्टचीही डागडूजी केली जाणार आहे. यामुळे प्रमुख मार्गांवरील मोक्याच्या चौकांमध्येही प्रखर प्रकाश पडेल. यासोबत मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर पालिकेच्या माध्यमातून मिरवणूक मार्गावरील बाजार वॉर्ड, मरीमाता मंदिर परिसर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार आदी ठिकाणी तसेच हंबर्डीकर चौक परीसरात दिवे लावण्यात येणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !