शेती साहित्य चोरण्याच्या प्रयत्नात मुक्ताईनगर पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
Muktai Nagar Police handcuffed two for trying to steal agricultural materials मुक्ताईनगर : कुर्हा परीसरातून शेती साहित्य चोरणार्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य चोर्यांचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.
अनेक चोर्यांचा होणार उलगडा
गेल्या काही दिवसांपासून कुर्हा परीसरातील शेतातील मोटार पंप, स्प्रिंकलर, केबल, पाईप, ठिबक नळ्या अशा शेती साहित्याची चोरी होण्याच्या अनेक घटना या परीसरात घडल्या होत्या. 23 ते 24 रोजी रात्रीच्या सुमारास राजू हनीफ खान (कुर्हा) यांच्या शेतातही चोरी होत असल्याचा प्रकार लक्षात येताच संशयीतांना पकडण्यात आले.






यांनी केली कारवाई
कुर्हा शिवारातील शेतात चोरी करतांना बिस्मिल्ला शहा अयुब शहा व मोईन सुपडू शहा (दोघेही रा.मुस्ताक अलीनगर पारपेठ, मलकापूर) या दोघांनाही पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दूनगहू, सहायक फौजदार संतोष चौधरी, पोलीस नाईक प्रदीप इंगळे, हरीश गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे, राहुल नावकर, अनिल देवरे, गोपीचंद सोनवणे, होमगार्ड रवी जाधव धुपेश्वर रस्त्यावर ही कारवाई केली. चोरट्यांकडून चार हजार रुपये किंमतीची लक्ष्मी कंपनीची तीन हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक पाण्याची मोटर जप्त करण्यात आली. तपास पोलीस नाईक प्रदीप मोहन इंगळे करीत आहेत.


