भुसावळात सेवानिवृत्त कर्मचार्याचे घर फोडले : 55 हजारांचा ऐवज लंपास
Retired employee’s house broken into in Bhusawal : 55 thousand compensation भुसावळ : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाहीत. जुन्या चोर्या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना पुन्हा नव्याने होणार्या चोरीमुळे नागरीक धास्तावले आहेत. शहरातील बी.झेड.हायस्कूल परीसरातील सेवानिवृत्त कर्मचार्याच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत 55 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
अयुब खान सुभान खान (60, बी.झेड.उर्दू हायस्कूलजवळ, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते गावाला परीवारास गेल्याने 14 ते 23 सप्टेंबदरम्यान घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली.
चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत 20 हजारांची रोकड, चार हजार चारशे रुपये किंमतीचे सौदी अरेबियाचे रीयाल हे चलन, 30 हजार रुपये किंमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे मणी असा एकूण 54 हजार 400 रुपयांचा ऐवज लांबवला. शनिवारी खान हे घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला व त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार यासीन पिंजारी करीत आहेत.
