गाव तेथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयार करा : जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे
भुसावळ : वंचित बहुजन आघाडी वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनतेच्या संपर्कात राहुन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच वंचित बहुजन आघाडीची जास्तीत-जास्त सभासद नोंदणी आवश्यक आहे. निवडणुका तोंडावर आल्या असून निष्क्रिय पदाधिकारी यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे अन्यथा पदमुक्त करण्यात येईल तसेच गाव तिथे शाखा व घर तिथे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता तयार करा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केले,
यांची बैठकीला उपस्थिती
वंचित बहुजन आघाडीची भुसावळ तालुका बैठक रविवारी साईननगर, वरणगाव येथे मनोज वानखेडे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावसकर उपस्थित होते. बैठकीत गाव तिथ शाखा व घर तिथे कार्यकर्ता निर्माण करणे, वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद नोदणी करणे, सर्कल गट, गण व बूथ बांधणी यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर यांनी तालुका पदाधिकारी यांना ग्रामीण भागात शाखा बांधणी बूथ बांधणी करण्याबाबत व जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.

यांची होती बैठकीला उपस्थिती
जिल्हा महासचिव दिनेश इखारे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, भुसावळ तालुका सल्लागार अॅड.प्रमोद तायडे, प्रशांत तायडे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भुसावळ कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रमेश खंडारे, भुसावळ तालुका उपाध्यक्ष गौतम लोखंडे, सचिन वानखेडे, भुसावळ तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव, मनोज वानखेडे, भुसावळ तालुका सचिव जितेंद्र सुरवाडे, भुसावळ तालुका उपाध्यक्ष सलीम शेख, भुसावळ तालुका उपाध्यक्ष संदीप सुरवाडे, भुसावळ तालुका सचिव योगेश सावळे, भुसावळ तालुका सदस्य रतन इंगळे, भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे, आकाश तायडे (वरणगाव), सुरज वाकोडे, कामगार आघाडी तालुका महासचिव तुषार पांडव, विश्वनाथ जोहरी (पिंपळगाव खुर्द) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुसावळ तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव यांनी सूत्रसंचालन तर आभार सचिन वानखेडे यांनी मानले.

