नाडगावात कोट्यवधी खर्चून बांधलेल्या बोगद्यात साचले पाच फूट पाणी


Five feet of water accumulated in the tunnel built at the cost of crores in Nadgaon
बोदवड :
बोदवड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूलावरील डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असतांना आता रेल्वे क्रॉसिंग बोगद्याला ग्रहण लागले आहे. आठवडाभरात पडलेल्या दमदार पावसाने बोगदा चार ते पाच फूट पाण्याने भरला आहे. रेल्वे गेट बंद होण्याची चर्चा जोरात सुरू असून तसे झाल्यास नाडगाव, नांदगाव येथील नागरीक व परीसरातील शेतकरी वर्ग बोगद्यातील तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करु शकणार नाहीत. जोपर्यंत बोगद्यातील पाणी उपसण्यासाठी पंप बसवला जात नाही तो पर्यंत रेल्वे गेट बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी भुसावळ विभागाच डीआरएम ईती पांडे यांच्याकडे शिवसेना कार्यकर्ता अमोल व्यवहारे यांनी केली आहे.

रेल्वे गेट बंद होण्याची जोरदार चर्चा
छत्रपती संभाजीनगर ते इंदौर महामार्गावर नाडगाव, नांदगाव येथील बोदवड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल सुरू केल्यानंतर अवघ्या आठच दिवसात त्याची चाळण झाली. सद्यस्थितीत उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूकदार उड्डाणपूलावरुन जाण्याऐवजी रेल्वे गेटमधून जाण्याचा पर्याय निवडत आहे मात्र रेल्वे गेट बंद करण्याच्या सूचना स्थानिक रेल्वे प्रशासनाला अवगत झाल्या आहेत. पर्यायी रस्ता म्हणून बोगद्याचे कामही पूर्ण अवस्थेत झाले आहे.

बोगद्यात साचले पाच फूट पाणी
बोगद्यातून वाहतूक सुरू झाली असून आठवड्यात पडलेल्या दमदार पावसाने बोगद्यात चार ते पाच फूट पाणी तुंबलेले आहे. बाहेरुन येणारे वाहतूकदार बोगद्यातून पाण्यातून गाडी नेत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. गावातील लहान मुलगा बोगद्यातून हातात दोर पकडून बैल नेत असताना त्याच्या तोंडापर्यंत पाणी आले त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ होतांना टळला. दुसरीकडे एका दुचाकीस्वाराने बोगद्यातून दुचाकी नेली असता बाईक पुर्णपणे बोगद्याच्या पाण्यात गेल्याने गाडी मध्येच बंद पडली. दुचाकी बाहेर काढली असता ऑईलमध्ये पूपर्णणे पाणी शिरले. यावर रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. बोगद्यातील पाणी उपसण्यासाठी तत्काळ पंप बसवावा, अशी अपेक्षा आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !