ईच्छापूर गावातील केळी सप्लायर्सचे दुकान फोडले : 62 हजारांचा ऐवज लंपास
Banana supplier’s shop in Ichchapur village was broken into: 62 thousand instead of lumpas मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील ईच्छापूर येथे केळी सप्लायर्सचे दुकान फोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसात गुन्हा दाखल
गुलाबराव देवराम घेटे (बेलदार, 46, ईच्छापूर) यांचा ईच्छापूर गावात श्री हरी केळी सप्लायर्सचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी दुकान घेतले आहे. 22 रोजी रात्री 10 ते 23 रोजी सकाळी 10 दरम्यान चोरट्यांनी दुकान फोडत 60 हजारांची रोकड तसेच 15 हजार रुपये किंमतीचे सीसीटीव्ही रीसीव्हर, एटीएम कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, कागदपत्र असा एकूण 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी बेलदार यांच्या तक्रारीवरुन मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय संतोष चौधरी करीत आहेत.






