यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा वृद्धाने केला विनयभंग


An old man molested a minor girl in Yawal Taluka यावल : यावल तालुक्यातील एका गावातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वयोवृद्धाने विनयभंग केला. या वृद्धाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात येताच अटक करण्यात आली.

वयोवृद्धाला पोलिसांकडून बेड्या
एका गावातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अंगणात खेळत असताना संशयीत बाळू नंदा पगारे या वृद्धाने तिला बोलावत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या कुटुंबाला सांगितला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बाळू पगारे याच्याविरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहेत. संशयीत आरोपी बाळू पगारे याला पोलिसांनी अटक केली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !