महात्मा फुले समता परिषद भुसावळ तालुकाअध्यक्षपदी प्रा.डॉ.जतीन मेढे


फैजपूर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदेच्य भुसावळ तालुकाध्यक्षपदी भालोद महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जतीन मेढे यांची नियुक्ती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ आदेशान्वये राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक (नाशिक) यांनी केली.

24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी लोकांना खरा मानवी धर्म कळण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या ऐतिहासिक घटनेला 150 वर्ष पूर्ण झालीत. या ऐतिहासिक घटनेच्या दिवसाला झालेली माझी निवड मला नक्कीच बळ देईल, अशी भावना डॉ.मेढे यांनी व्यक्त केली. निवडीबद्दल प्रा.मेढे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !