35 हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार जाळ्यात


Police constable caught in the net while accepting a bribe of 35 thousand नाशिक : पकडण्यात आलेले वाहन सोडवण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 35 हजारांची लाच घेताना नाशिक तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत विल्होळी पोलीस चौकी नाशिक ग्रामीणचा हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले (39) व खाजगी तरुणाला नाशिक एसीबीने अटक केली. या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली.

असे आहे लाच प्रकरण
47 वर्षीय तक्राररदाराचे वाहनावर अडवल्यानंतर त्रूावर कारवाई न करता सोडून देण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 70 हजारांपैकी 35 हजारांची लाच  घेताना हवालदार रवींद्र मल्ले यास अटक करण्यात आली तर खाजगी पंटरदेखील जाळ्यात अडकला.

यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार प्रफुल्ल माळी, प्रमोद चव्हाणके, विनोद चौधरी, संजय ठाकरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !