चोरीच्या 150 नळांसह भामटे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


Bhamte in Shirpur police net with 150 stolen taps शिरपूर : हार्डवेअर दुकानातून नळ लांबवणार्‍या दोघा भामट्यांना शिरपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 60 हजारांचे 150 नळ जप्त केले आहेत. सूर्यकांत उर्फ सतीश गोविंद महाजन (38, रा.वरवाडे, शिरपूर) वसोनू चंद्रकांत कलाल (24, रा.रामसिंह नगर, शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
ताजपुरी येथील रहिवासी प्रदीप किशोर शिरसाठ शहरातील रीक्रिएशन गार्डनजवळील हार्डवेअरचे दुकान असून या दुकानाचा पत्रा उचकटून 60 हजार रुपयांचे महागडे नळ लांबवण्यात आले होते. शिरपूरचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांना शहरातील पाच कंदीलकडून खंडेराव मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन तरुण पिशव्यांमध्ये नळ घेऊन आल्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.






ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, हवालदार विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, विजय पाटील यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !