जळगाव जिल्ह्याच्या अपर पोलिस अधीक्षकपदी अशोक नखाते
Ashok Nakhate as Additional Superintendent of Police of Jalgaon district भुसावळ : जळगावचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची नाशिक पोलिस अकादमीत बदली झाली असून त्यांच्या जागी प्राचार्य अशोक नखाते बदलून येत आहेत. राज्यातील पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अनेक अधिकार्यांच्या राज्य शासनाच्या अवर सचिवांनी सोमवारी सायंकाळी बदल्या केल्या आहेत.
चंद्रकांत गवळी यांची कौतुकास्पद कामगिरी
अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गुन्ह्यांच्या शोधात महत्वाची भूमिका पार पाडली. उत्तम जनसंपर्क आणि सहकार्यांकडून चांगली कामगिरी करवून घेण्याचा लौकीक असणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. शांत, संयमी व अभ्यास अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख आहे. चंद्रकांत गवळी यांनी जळगावात आजवरचा सर्वाधिक काळ सेवा बजावली असून ती वर्ष ते जळगावच्या अपर पोलिस अधीक्षकपदी राहलिे. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नखाते हे जळगावचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.





