सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत उमेदवार निघाला 20 घरफोड्यांचा धनी : जळगाव गुन्हे शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या


जळगाव : जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभूत झालेला सरपंच पदाचा उमेदवार अट्टल घरफोड्या निघाल्या असून त्याने तब्बल 20 घरफोड्यांची कबुली दिली आहे. प्रवीण सुभाष पाटील (32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलिस चौकशीत 20 गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार व एक पल्सर मोटरसायकल असा एकूण 20 लाख 29 हजार 691 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे तर आरोपीला अधिक तपासार्थ पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वारेमाप पैशांची उधळण अन् रूबाबामुळे आरोपी अडकला जाळ्यात
जळगाव तालुक्यातील बिलवाडी या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पॅनल व सरपंच पदासाठी उभे असलेले उमेदवार प्रवीण पाटील यांचा पराभव झाला. या उमेदवाराने निवडणुकीत चांगलाच पैसा खर्च केला. पैसा खर्च करूनही त्याचा पराभव झाला मात्र त्याच्या रुबाबात कोणताही फरक पडला नाही. त्याच्या प्रगती मागील कारणांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नजन पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या सहकार्याने त्याला ताब्यात घेतले.

20 घरफोड्यांची उकल
संशयित आरोपी प्रवीण पाटील याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून दीडशे ग्रॅम सोने, एक स्विफ्ट कार, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. त्याने जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर घरफोड्या केल्याचे कबुली दिली. प्रवीण पाटील यांनी निवडणूकीत केलेला खर्च व त्याचा झगमगाट पाहून त्याच्यावर वाढलेल्या संशयामुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला. स्थानिक गुन्हे शाखेने प्रवीण सुभाष पाटील (32) याला तीन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !