गुन्हेगारांना धडकी तर पोलिस दलाचा नावलौकीक वाढवणार्‍या कृतीवर भर

धुळ्यातील नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची जिल्हावासीयांना ग्वाही


Emphasis on actions that increase the reputation of the police force when it comes to criminals धुळे : गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याचा निश्चित धाक वाटेल अशी कृती आगामी काळात पोलिस दलाची असेल शिवाय पोलिस दलाचा नावलौकीक निश्चितपणे उंचावेल या पद्धत्तीने कामकाजाला प्राधान्य असेल, अशी ग्वाही धुळे जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी दिली. गुरुवारी धीवरे यांनी अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.

अवैध धंद्यांचा बीमोड : गुन्हेगारांना धडकी भरणारी कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक धीवरे यांचे पोलिस दलातर्फे गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर स्वागत करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या सर्वाधिक तक्रारी आहेत त्यामुळे अवैध धंद्यांचा बीमोड करण्यात येईल शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तींवर एमपीडीए, मोक्कासारख्या कारवाया पोलिस दलातर्फे आगामी काळात केल्या जातील. जनतेचा पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ करण्यावर पोलिसांचा भर असेल. गुन्हेगारी प्रवृत्तींना पोलिस दलाची धडकी भरेल, अशीच कृती यापुढे पोलिस दलाची असेल, असे सूचक विधानही धीवरे यांनी केले.






पोलिसांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणणार
जिल्हा पोलिस दलातील बदली प्रक्रिया यापुढे अत्यंत पारदशीर्र्पणे राबवण्यात येईल शिवाय पोलिस बांधवांचे मनोबल उंचावणारी कृती आपली आगामी काळात दिसेल, असेही नूतन अधीक्षक धीवरे यांनी सांगितले. धुळे जिल्ह्याचा सखोल अभ्यास करून प्रत्यक्षात कारवाई लवकरच दिसेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताजी शिंदे आदी अधिकार्‍यांनी नूतन अधीक्षकांचे स्वागत केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !