धुळ्यातील घरफोडीचा उलगडा : 71 हजारांच्या मुद्देमालासह घरफोडे जाळ्यात

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई : चोर्‍या उघडकीस येण्याची आशा


The solution to house burglary in Dhule : Burglary net with 71 thousand items धुळे : धुळ्यातील देवपूर परीसरातील सिद्धीविनायक कॉलनी, अनमोल नगर भागात झालेल्या घरफोडीची उकल धुळे स्थानिक गुन्हे शाखेने केली असून दोघा घरफोड्यांना अटक केली आहे. संशयिताकडून घरफोडीतील 71 हजारांच्या देवघरातील चांदीच्या मूर्ती जप्त केल्या आहेत तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. साहील शरीफ बेग (19, पंचशील स्तंभाजवळ, मोगलाई, धुळे) व रूपम दिनेश सोनवणे (22, नकाणे रोड, आंबेडकर नगर, देवपूर, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चोरीप्रकरणी दाखल होता गुन्हा
अनमोल नगरातील रहिवासी मिलिंद यशवंतराव देसले (55, धुळे) यांच्याकडे 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी घरफोडी करीत 96 हजारांच्या देवघरातील चांदीच्या मूर्ती लांबवल्या होत्या. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गोपनीय माहितीवरून खांडेल विप्र भुवन, स्नेह नगरातून संशयितांच्या मुसक्या बांधल्या. संशयितांनी पोलिसांना 68 हजार रुपये किेंमतीच्या महालक्ष्मी, गणपती, विठ्ठल-रूखमाई व बाळकृष्ण अशा चांदीच्या मूर्ती तसेच तीन हजार रुपये किंमतीची पितळी गाय काढून दिली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळ्याचे नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, श्याम निकम, प्रकाश सोनार, हेमंत बोरसे, संदीप जगन्नाथ पाटील, योगेश चव्हाण, सुरेश भालेराव, प्रल्हाद वाघ, मायुस सोनवणे, तुषार सूर्यवंशी, योगेश साळवे आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !