धुळ्यात 77 लाखांचे चोरीचे भंगार जप्त : 20 विक्रेत्यांविरोधात गुन्हा
नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे अॅक्शन मोडवर : मोहाडी पोलिसांच्या कारवाईने खळबळ
Stolen scrap worth 77 lakhs seized in Dhule : Crime against 20 sellers धुळे : धुळे जिल्ह्याची धुरा नूतन पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी सांभाळताच गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध धंदे चालकांविरोधात पोलिस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मोहाडी पोलिस ठाणे हद्दीतील तब्बल 20 भंगार विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडील तब्बल 77 लाखांचे चोरीचे भंगार साहित्य जप्त करण्यात आल्याने भंगार विक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या दुकानदारांनी गॅस कटरच्या सहाय्याने विविध वाहनांचे तुकडे करून त्यांची अवैधरीत्या विक्री चालवल्याचा प्रकारही समोर आला आहे.
20 विक्रेत्यांविरोधात मोहाडी पोलिसात गुन्हे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील महामार्गालगत 20 ते 22 भंगार विक्रेत्यांनी लहान-मोठ्या चारचाकी वाहनांसह अवजड वाहनांना गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्याचे रेडीएटर, कॅबीन, बॉडी, इंजिन व चेसीस आदींची विक्री चालवली होती. मोहाडी पोलिसांनी शुक्रवारी याबाबत संबंधित विक्रेत्यांना विचारणा केल्यानंतर संंबंधित वाहने व पार्टस्ची कुठून आणली वा त्यांच्या कागदपत्रांबाबत कुठलीही समाधानकारक माहिती न मिळाल्याने हा मुद्देमाल चोरीचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढत तब्बल 20 विक्रेत्यांविरोधात भादंवि 379, 411 व 34 प्रमाणे मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी निरीक्षक शशिकांत पाटील, संदीप काळे, किसन चौधरी, प्रभाकर सोनवणे, किरण कोठावदे, संदीप कदम, प्रेमराज पाटील, भूषण सपकाळे, सुमित चव्हाण, वाहन चालक नागेश पिंगळे आदींच्या पथकाने केली.
