साक्री शहरात चाकूच्या धाकावर दरोडा : एक लाखांचा ऐवज लुटला ; 23 वर्षीय तरुणीचे अपहरण

धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव : दरोडेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना


Knife-point robbery in Sakri city: One lakh was stolen; Kidnapping of 23-year-old girl साक्री : शहरातील एका भागात पिस्टल व चाकूचा धाक दाखवून 30 ते 35 वयोगटातील तोंडाला मास्क बांधलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकत सुमारे 88 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला तर 23 वर्षीय तरुणीचेदेखील अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी साक्री पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही बाजूने या गुन्ह्याचा तपासाला वेग दिला आहे.

साक्री शहरात दरोड्याने खळबळ
साक्री शहरातील एका परीवारातील कर्ता पुरूष बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांची भाची घरी असताना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हिंदी भाषा बोलणार्‍या एका 30 ते 35 वयोगटातील दरोडेखोरांनी प्रवेश केला व त्यानंतर अन्य चार संशयितांनी तोंडाला मास्क बांधून घरात प्रवेश केला. यावेळी चाकूसह पिस्टलाचा धाक दाखवून महिलेला हिंदीतच दागिण्यांची विचारणा करण्यात आली व यावेळी महिलेला धमकावून मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी तिजोरीतून 88 हजार 500 रुपयांचे दागिने लुटले तर यावेळी 23 वर्षीय तरुणीचे हात बांधून तिचे कारमधून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.






पोलिस अधिकार्‍यांची धाव
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलिस पथकाने धाव घेतली. श्वान पथकाने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला. याप्रकरणी साक्री पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने तपास
साक्री पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. दरोड्यानंतर तरुणीचे अपहरण करण्यात आल्याने पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपासाला वेग दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजसह खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट केले आहे. रविवारी रात्री अवघ्या 10.30 वाजता पडलेल्या दरोड्यामुळे मात्र साक्री शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !