साक्रीत दरोड्यानंतर अपहरण केलेल्या तरुणीला सेंधव्यात सोडून दरोडेखोरांचे पलायन

साक्री पोलिसांनी तरुणीचा घेतला ताबा : तरुणीच्या कबुली जवाबानंतर दरोड्याची उकल होण्याची आशा


After the robbery in Sakrit, the robbers fled leaving the abducted girl in Sendhwaya साक्री : शहरातील एका भागात पिस्टल व चाकूचा धाकावर 30 ते 35 वयोगटातील दरोडेखोरांनी महिलेला मारहाण करीत सुमारे 88 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटत 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केले होते. या प्रकारानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान, अपहरण केलेल्या तरुणीला सेंधवानजीक सोडून दरोडेखोरांनी पलायन केल्याची बाब समोर आली आहे तर तरुणीने स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर तिला साक्री पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

साक्री शहरात दरोड्याने खळबळ
साक्री शहरातील एका परीवारातील कर्ता पुरूष बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांची भाची घरी असताना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हिंदी भाषा बोलणार्‍या एका 30 ते 35 वयोगटातील दरोडेखोरांनी प्रवेश केला व त्यानंतर अन्य चार संशयितांनी तोंडाला मास्क बांधून घरात प्रवेश केला. यावेळी चाकूसह पिस्टलाचा धाक दाखवून महिलेला हिंदीतच दागिण्यांची विचारणा करण्यात आली व यावेळी महिलेला धमकावून मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी तिजोरीतून 88 हजार 500 रुपयांचे दागिने लुटल्यानंतर 23 वर्षीय तरुणीचे हात बांधून तिचे कारमधून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.






अपहृत तरुणी सेंधव्यात सापडली
साक्री पोलिस व गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा तपास समांतर सुरू असताना सेंधवा शहराजवळ तरुणीला सोडण्यात आले व तरुणीने स्थानिक एमपी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर घडला प्रकार कथन केला. शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे व सहकार्‍यांनी सोमवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर साक्री पोलिसांच्या ताब्यात दिले.

तरुणीच्या कबुली जवाबानंतर दरोड्याची होणार उकल
अपहरण झालेली तरुणी सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तरुणीने दिलेल्या माहिती व कबुली जवाबानंतर या दरोड्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !