फागण्यात ट्रकसह 30 लाखांचा ऐवज लूटला : पाच तासात आरोपी जाळ्यात
धुळे तालुका पोलिसांची कामगिरी : आरोपींच्या अटकेने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
30 lakhs looted with a truck in fhagne : Accused in the net in five hours धुळे : ट्रक चालकाचा रस्ता अडवत मारहाण करीत ट्रकसह 30 लाखांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता. ही घटना धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फागणे गावाजवळ सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अवघ्या पाच तासात धुळे तालुका पोलिसांनी तपासचक्रे फिरवत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत तर लांबवलेल्या ट्रकसह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मारहाण करीत लांबवला ट्रक
ट्रक चालक महम्मद ईरशाद कुरेशी (रा.अबदालपूर, ता.सोराव, जि.जनपथ प्रयागराज, उ.प्र.) हा रविवार, 26 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ट्रक क्र. (सी.जी.06 जे.डी.1882) ने रायगडहून सुरतकडे निघाले असता फागणे गावाजवळ क्रेटा वाहनातून आलेल्या चौघांनी ट्रक अडवत चालक व सहचालका यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली तसेच त्यांच्याजवळील चार हजार 300 रुपयांची रोकड व मोबाईल हिसकावत ट्रक लांबवला होता. या ट्रकमध्ये 14 लाख 45 हजार 915 रुपये किंमतीचे एम.एस.पाईप होते. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





पाच तासात आरोपी जाळ्यात
धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या पाच तासात गुन्ह्याची उकल करीत नाकाबंदी मोहिम राबववली. गुन्ह्यात वापरलेली कार (एम.एच.39/9511) तसेच लांबवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह पथकातील अनिल महाजन, प्रवीण पाटील, नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.
