राष्ट्रवादीच्या जळगावातील आक्रोश मोर्चाला रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी धडक देणार
यावल शहरात राष्ट्रवादी लोकसभाक्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांची माहिती
यावल : सध्या राज्यभरात शेतकरी व जनतेमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड रोष असून केळी पीकविमा, कापसाचे पडलेले दर, शेती साहित्याची चोरी, शेत रस्ते अश्या अनेक समस्या सोडवण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होणार असल्याची माहिती यावलचे माजी नगराध्यक्ष तथा रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी दिली आहे. ते शेतकी संघाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रवादीच्या बैठकीत बोलत होते.
जिल्हा दुष्काळी जाहीर होण्यासाठी मोर्चा
यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादीचे लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीशअण्णा पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, अरुण पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात गुरुवार, 30 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकर्यांसह राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सह जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा, कापसाला प्रती क्विंटल 12 हजार रुपये हमीभाव मिळावा यासह शेती साहित्याची चोरी थांबवावी, पन्नी दारू बंद व्हावी व कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हावी अशा मागण्या करण्यात येणार आहेत. या मोर्चात रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून यावल तालुक्यातुन देखील मोठ्या संख्येत शेतकरी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीत रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटीलसह रावेर लोकसभा संपर्कप्रमुख डॉ.मनोहर पाटील, चोपडा पंचायत समितीचे माजी समिती सभापती डी.पी.साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, एम.बी.तडवी, युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, सैय्यद सईद, अय्युब खान, सारंग अडकमोल, हाजी अकबर खाटीक, ललित पाटील, किरण पाटील, प्रसन्ना पाटील, अरुण लोखंडे, वसंत पाटील, विनोद पाटील, युवक शहराध्यक्ष हितेश गजरे, मयूर पाटील, शहर कार्याध्यक्ष मोहसीन खान, यशवंत जासूद, निलेश बेलदार, हाजी फारुक शेख, सलीम तडवी, ताहेर खान, ललित पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष रोहन पाटील, यशवंत पाटील, अमोल दुसाने, पितांबर महाजन, तुषार घारू, एजाज मन्यार, तुषार येवले, सचिन येवले, जाहिद कुरेशी, आबीद कच्छी, विजय साळी, सय्यद सुभान बिलाल, अमीर खानसह आदींची उपस्थिती होती.
20 ट्रॅक्टर यावल तालुक्यातून जाणार
जळगाव येथे होणार्या जन आक्रोश आंदोलनात यावल तालुक्यातून 20 ट्रॅक्टर नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावल तालुक्यातील विविध भागातून कशा प्रकारे आंदोलनात पोहाचले जाईल, याची देखील रूपरेषा या बैठकीत निश्चित करण्यात आली आहे.





